अंगणवाडीस्तरावर उत्कृष्ठ काम केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण

सिंधुदुर्गनगरी, दि. १३ मार्च

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांनी अंगणवाडीस्तरावर उत्कृष्ठ काम केल्याबद्दल त्यांना सन 2023-24 चा जिल्हा परिषदेचा आदर्श पर्यवेक्षिका, आदर्श अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळसाहेब पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.बा.वि.) संतोष भोसले, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, व पुरस्कार प्राप्त पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी सेविका व मदतनिस उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वरुपात र.रु. 10,000/-, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्न देऊन पुरस्कारकर्त्यांना सन्मानित करण्यात आले.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची जिल्हा आदर्श पुरस्काराची निवड यादी पुढीलप्रमाणे आहे.