कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केली पाहणी ; कणकवली उपजिल्हा रुग्णालय रुग्णांसाठी दर्जेदार बनवणार
कणकवली दि.१३ मार्च(भगवान लोके)
कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छतागृह दुरावस्थेसंदर्भात संडास बाथरूमची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांनी वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे तक्रारी येत होत्या. वारंवार होणाऱ्या तक्रारी नंतर रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांना कळविले होते. त्याच अनुषंगाने बुधवारी सायंकाळी कार्यकारी अभियंता श्री.सर्वगोड यांनी
प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन दुरावस्थेची पाहणी करीत रुग्णांसाठी तातडीने दुरुस्तीचे आश्वासन दिले आहे.
यावेळी आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे यांनी रुग्णालयातील सर्व विभाग कार्यकारी अभियंता श्री.सर्वगोड यांना दाखवून तेथील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी श्री सर्वगोड यांनी तातडीने ठेकेदाराला बोलावून पुढील आठ दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.त्यामध्ये हॉस्पिटलच्या स्पेशल रूमचे काम तातडीने पूर्ण करणे ,संडास बाथरूम दुरुस्ती, वार्डमधील खिडक्यांच्या काचा बदलणे ,ड्रेनेज पाईप बदलणे, गंजलेली शेटर्स बदलणे अशा विविध समस्या कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.
देवगड,वैभववाडी व कणकवली या तालुक्यातील महत्त्वाचे असलेले हे कणकवली उपजिल्हा रुग्णालय सर्व सामान्य रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी दर्जेदार बनवून देऊ असा विश्वास श्री.सर्वगोड यांनी व्यक्त केला.