मुंबई,दि.१४ मार्च
पालशेत हायस्कूल मधील सन 1980 81 ची बॅच मधील मित्र-मैत्रिणी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येवुन तब्बल 42 वर्षांनी एकत्र येण्याचे ठरले गुहागर तालुक्यातील मोडकाघर येथील शांताई रिसॉर्ट मध्ये दि. २ मार्च व ३ मार्च रोजी स्नेह संमेलन संपन्न करण्यात आला यामध्ये 35 मित्रमंडळीनी हजेरी लावली होती.
ह्या दोन दिवसात बालपणीच्या आठवणी तसेच स्वयं परिचया मधुन आपल्या कुटुंबाची माहिती आदान प्रदान केली ह्या दोन दिवसांमधील पहिल्या दिवशी गुहागर येथील समुद्रावर सफर तसेच नवनवीन गेम, गाणी, थट्टा मस्करी यात दिवस रंगून गेला
दुसऱ्या दिवशी रविवारी सेल्फी सेशन, मनोगत नंतर आमचे गुरुवर्य श्री. विजय जाधव सर यांच्या सोबत भोजन व त्यानंतर पालशेत हायस्कूलला जाण्यासाठी रवाना झालो.
शाळेत गेल्यावर आमचा १०वीच्या वर्गात जाऊन त्यावेळीचे शिक्षक श्री. विजय जाधव यांच्याकडून पटावर हजेरी लावण्यात आली हा शाळेतील सुंदर क्षण 42 वर्षांनी पुन्हा अनुभवता आला होता.
त्यानंतर शाळेच्या सभागृहामध्ये सर्वांच्या वतीने गुरुजनांचे पूजन केले त्यानंतर श्री. मनोज जोगळेकर मुख्याध्यापक यांच्याकडून शाळेची झालेल्या प्रगती बद्दल माहिती दिली तसेच आम्हा माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला. आमच्या १९८०-८१ च्या बॅच कडून शाळेच्या सभागृहासाठी १०० खुर्च्यांची भेट दिली तसेच शिक्षक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचा आम्ही सत्कार केला.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी चहा पाणी देऊन कार्यक्रमाची सांगता केली. शाळेतून परतीच्या प्रवासाला निघताना सर्वांच्या डोळ्यात पाणी होते कारण एवढ्या वर्षांनी झालेली भेट काही क्षणातच संपणार होती
प्रत्येकाच्या मुखी एकच वाक्य होते पुन्हा कधी भेटायचे