काजू बी १० रुपये प्रति किलो अनुदान मिळणार ; सातबारा वरील पीक पाहणी नोंदीच्या आधारावर अनुदान निश्चित होईल
कणकवली दि.१४ मार्च(भगवान लोके)
भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा अशी मागणी सातत्यपूर्वक शासनाकडे लावून धरली होती. अखेर कोकणातील शेतकऱ्यांसाठी १० रुपये प्रति किलो मागे २ टन काजू बी उत्पादनापर्यंत अनुदान दिले जाईल.त्यासाठी ७/१२ वरील काजू लागवड पिक पाहणी नोंद असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षी अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.त्यासाठी ३०० कोटी रक्कम मंजूर केल्याची घोषणा रत्नागिरी येथील एका सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.
१ टन म्हणजे १ हजार किलो,त्यामुळे सुमारे २ हजार किलो पर्यंत १० रुपये प्रति किलो दराने २० हजार रुपये पर्यंत शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे,असे प्रमोद जठार यांनी सांगितले.