युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्या आंदोलनाच्या ईशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग
देवगड,दि.१४ मार्च
देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलेसिंग सेंटर गेल्या काही दिवसापासून बंद असून रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता डायलिसिस सेंटर दोन दिवसात सुरू करा अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी दिला असता ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर पुन्हा सुरू झाल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
देवगड ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटर हे गेले कित्येक दिवस बंद असून सदर प्रकार गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा घडला आहे त्यामुळे देवगड मधील डायलेसिसच्या पेशंटला प्रायव्हेट हॉस्पिटलला जावे लागत आहे त्यामुळे डायलेसिंगच्या रुग्णांची गैरसोय होत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो डायलिसिस मशीन येत्या दोन दिवसात सुरू झाली नाही तर आम्ही युवा सेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयासमोर आंदोलन करू असा इशारा युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांनी निवेदनाद्वारे वैद्यकीय अधीक्षक यांना दिला असता गुरुवारी डॉक्टर विटकर यांची भेट घेतली असता डायलिसिस सेंटर पुन्हा एकदा सुरू झाले असल्याची माहिती युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांना दिली.
यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कोळकरणी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.