सिंधुदुर्ग व्हाइस मिडियाच्या वतीने १८ मार्च रोजी सिंधुदुर्ग ओरोस येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी दि १४ मार्च 
सिंधुदुर्ग व्हाइस मिडियाच्या वतीने सोमवार दि.१८ मार्च रोजी सिंधुदुर्ग ओरोस येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकार, पत्रकारांचे कुटुंब आणि नागरिकांनी सहभागी व्हावे सकाळी १० ते ४ वाजता या वेळी होणार आहे.

सिंधुदुर्ग व्हाइस मिडिया जिल्हाध्यक्ष परेश राऊत यांनी ही माहिती दिली. यावेळी कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर,
उपाध्यक्ष विष्णू धावडे,मिलींद धुरी, भुषण सावंत, सचिव विष्णू चव्हाण, सहसचिव संजय पिळणकर,खजिनदार शैलेश मयेकर,
सहखजिनदार नयनेश गावडे, संघटक आनंद कांडरकर, बी एन खरात आदी उपस्थित होते.

पत्रकार आणि पत्रकारांच्या कुटुंबासाठी आमची संघटना काम करत असून सोमवारी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले ते म्हणाले ,यावेळी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, उद्योजक विशाल परब, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन मनोज जोशी आदी उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात सर्व प्रकारच्या चाचण्या ,तपासण्या आणि उपचार करण्यात येणार असून औषध मोफत दिले जाणार आहेत त्याशिवाय आयुष्यमान कार्डही दिले जाणार आहे. तसेच पत्रकांच्या कुटुंबांच्या बाबतीत शैक्षणिक, आरोग्य विषय उपक्रम देखील हाती घेण्यात येणार असून पत्रकारांसाठी दहा लाख रुपयांचा विमाही उतरला जाणार असल्याचे यावेळी परेश राऊत यांनी सांगितले.