कणकवली दि.१४ मार्च(भगवान लोके)
कलमठ बिडयेवाडी येथील भालचंद्र अपार्टमेंट व मूळ उत्तर प्रदेश येथील संजय रामसिंगर उपाध्याय ( वय ३८) याने राहत्या फ्लॅट मध्ये आतून कडी लावून घेत फॅनच्या हुकाला ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची खबर पत्नी प्राची संजय उपाध्याय (वय २८, रा. कलमठ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.त्यामध्ये मी मुलांना घेवून दुपारी १.३० वाजता घरी आले असता घराचा मुख्य दरवाजा बंद होता.संजयला हाक मारली असता आवाज येत नव्हता.माझ्या मुलांना भूक लागली म्हणून दरवाजा उघडत नसल्याने मी गडग्यावर चढून मी खिडकीतून पाहिले.तर त्यांनी घरातील सीलिंग फॅनच्या हुकाला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आले.मी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी असलेल्या ग्रामस्थांनी दार तोडून घरात प्रवेश करत ओढणी कापून त्यांना उपजिल्हा रुग्णालय नेले.मात्र,तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.संजय यांना दारु पिण्याचे वेसन होते.संजय गवंडी काम करुन उदरनिर्वाह करीत होता.
या घटनेचे माहिती मिळताच पप्पू यादव, सिद्धार्थ कदम,गणेश पुजारे,बसप्पा पुजारे,मंजुनाथ देसाई, सलमान शेख ,श्री.राऊत सर,निनाद नाडकर्णी आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत
त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.