देवगड,दि.१४ मार्च
भाताचा टोप उतरताना साडीच्या पदराला लागलेल्या आगीने गंभीर जखमी झालेल्या शिरोली गावठणवाडी येथील विजया सखाराम गुरव ८१ या वृद्ध महिलेच्या ओरस जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना १३ मार्च रोजी सायंकाळी ५.१५ वाजता मृत्यू झाला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिरोली गावठणवाडी येथील विजया सखाराम गुरव या दिनांक १३ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता चुलीमध्ये आग पेटवून जेवन करीत होत्या. त्याचवेळी घरातील सर्व माणसे कामानिमित्त बाहेर गेले होती. घरात ती एकटीच होती सकाळी चुलीवर जेवन करीत असताना भाताचा टोप चुलीवरून खाली उतरवित होत्या यावेळी चुलीतील आगीने त्यांचा साडीच्या पदराचा पेट घेतला. त्यामुळे त्या ६५ टक्के भाजल्या होत्या. त्या घरी एकट्याच असल्याने त्याच अवस्थेत साडी बदलून त्या फॅन खाली बसून राहिल्या होत्या.दरम्यान मुलगा घरी आले नंतर त्याला सर्व माहिती कळताच त्याने भाजलेल्या स्थितीत गंभीर जखमी झालेल्या आईला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी देण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला याबाबत त्यांचा मुलगा प्रकाश सकाराम गुरव यांनी देवगड पोलिसांना खबर दिली असून देवगड पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली असून याबाबतच्या अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष कदम करत आहेत