दांडी किनारपट्टीवर समुद्री उधाणाचा फटका

मालवण, दि.१४ जानेवारी

मालवण किनारपट्टीवरील दांडेश्वर मंदिर ते मोरेश्वर मंदिर दरम्यान दांडी किनारपट्टीवर समुद्री उधाणाचा मोठा फटका बसला. समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात आत घुसल्याने मच्छिमार तसेच पर्यटन व्यवस्यायिक यांना त्रास सहन करावा लागला.

दरम्यान याबाबत माहिती मिळताच मालवण नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने तात्काळ कार्यवाही करत उपाययोजना करण्यात आल्या. आत घुसलेल्या पाण्याला मार्ग करून पाणी बाहेर काढण्यात आले. अशी माहिती संमेश परब यांनी दिली असून पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.