सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक आर.जी सावंत यांचे निधन

कणकवली दि.१४ मार्च
भिरवंडे-हनुमंतवाडी नं.2 मधील रहीवासी व एसटी महामंडळातील सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक रामचंद्र गणपत सावंत उर्फ आर.जी.सावंत (83) यांचे बुधवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. आर.जी. कंडक्टर म्हणून ते सर्वत्र परिचित होते. एसटीत सुरूवातीला वाहक आणि त्यानंतर वाहतूक नियंत्रक म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.