महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक विद्यार्थी सेनेचे यश सरदेसाई यांच्या हस्ते

मालवण, दि.१४ मार्च

मालवण शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक विद्यार्थी सेनेचे यश सरदेसाई यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी मालवण शहरातील युवकांनी मनसे पक्षात पक्ष प्रवेश केला. महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक विध्यार्थी सेनेचे यश सरदेसाई, पक्ष निरीक्षक गजानन राणे, संदिप दळवी, जिल्हाध्यक्ष धीरज परब, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेच्या मालवण कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उदघाटन पार पडले. यावेळी सागर जाधव यांच्यासह अनेक युवकांनी मनसे पक्षात प्रवेश केला. यावेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नवयुवकांना मार्गदर्शन करत पक्ष वाढीसाठी काम करा असे सांगितले.

गजानन देसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अमित इब्रामपूरकर, विशाल ओटवणेकर, सायली मांजरेकर, दया मेस्त्री, गुरु तोडणकर, विल्सन गिरकर, आबा आडकर, हर्षद पाटकर, स्वाती सावंत, रश्मी दाभोलकर व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.