स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे काश्मीर ३७० कलम हटविण्याचे स्वप्न मोदी सरकारने पुर्ण केले
कणकवली दि.१५ मार्च(भगवान लोके)
सीसीए ॲक्टची अंमलबजावणी केंद्र
सरकारने केली. २०१९ च्या जाहीरनाम्यात दिलेले वचन भाजपाने पूर्ण केले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेही काश्मीर बाबत ३७० कलम हटविण्याचे स्वप्न मोदी सरकारने पुर्ण केले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत भाजपाच्यावतीने आम्ही करीत आहोत.सीसीए कायद्याचा विरोधक अपप्रचार करत असल्याची टीका माजी आ.प्रमोद जठार यांनी केली.त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मोदी सरकारने साकार केले. त्या मताशी विनायक राऊत आणि त्यांचा पक्षाचे मत काय आहे? हे त्यांनी जाहीर करावे,असे खुले आव्हान त्यांनी दिले.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बबलू सावंत ,राजू पवार,सदानंद चव्हाण,शिशिर परुळेकर,संतोष पुजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुस्लिम बांधवांना ह्या कायद्याचा त्रास होणार आहे. हे खरे नसून उलट वरील बांगलादेश,पाकिस्तान, अफगाणिस्तान या तिन्ही देशातील जे मुस्लिम भारतात नागरिकत्व शिवाय राहत आहेत अशा मुस्लिम बांधवांना आता भारतीय नागरिकत्व मिळणे सुलभ होणार आहे.1955 च्या कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व कोणाला द्यावे याबाबत काही बदल करण्यात आले. 1947 पासून डिसेंबर 2014 पर्यंत भारतात बांगलादेश, पाकिस्तान अथवा अफगाणिस्तान मधून जे प्रताडीत निर्वासित भारतात राहिले आहेत. त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. हे तिन्ही देश पूर्वीच्या अखंड भारताचा भूभाग होता. बहुसंख्यांकांनी या देशात अल्पसंख्याकांचा छळ केला.त्या निर्वासित भारतात राहत आहेत. अशा सर्व नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे,असे प्रमोद जठार यांनी सांगितले.