उ.बा.ठा.सेनेच्या वतीने कुणकेश्वर चरणी विजय संकल्प महाअभिषेक

पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून यावेत कुणकेश्वर चरणी साकडे

देवगड,दि.१५ मार्च

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कुणकेश्वर चरणी विजय संकल्प महाअभिषेक करण्यात आला. विनायक राऊत यांना दीर्घायुष्य लाभो व ते पुन्हा खासदार म्हणून भरघोस मतांनी निवडून यावेत, असे गाऱ्हाणे सेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी घातले.

यावेळी तालुकाप्रमुख मिलिंद साटम युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर माजी सभापती रवींद्र जोगल, विभाग प्रमुख गणेश वाळके, काका जेठे, प्रगती तेली,संतोष लाड, संतोष आचरेकर, शरद वाळके, मंगेश फाटक आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच दिवीजा वृद्धाश्रम असलदे येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात असल्याची माहिती तालुकाप्रमुख मिलिंद साटम,युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी दिली.