आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने तिर्लोट गावात विकास कामांचा शुभारंभ

देवगड,दि.१५ मार्च
देवगड तालुक्यातील तिर्लोट गावातील आम नितेश राणे यांच्या निधीतून मंजूर विकास कामांचा तसेच त्यांच्या प्रयत्नाने देवगड तालुक्यातील तिर्लोट गावातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
यात
तिर्लोट मोहुळ भाटवाडी कोयंडेघर ते सारंग घरापर्यंत डांबरीकरण करणे आमदार फंड- रुपये ६ लाख*
खालचे मोहुळ गटारलाईन बांधणे(डोंगरी विकास) २लाख पंचायत स्थरावर १.५ लाख
ठाकुरवाडी फाटा (टेंब) ते खालचे मोहुळ रुपये ३० लाख*
वरचे मोहुळ अंगणवाडी छप्पर दुरुस्ती (लघुपाट बंधारे) २.५लाख*
तिर्लोट गांववाडी गोल विहीर ते बौद्धवाडी मार्गे अनभवणे वाडी (दलितवस्ती) २१ लाख
दलितवस्ती (२३-२४ कार्यक्रम) बौद्धवाडी ,देवरुखकर हायमास्ट
तिर्लोट ग्रामपंचायत नविन इमारत (जनसुविधा) १२.०५ लाख
तिर्लोट मराठी शाळेजवळ नविन व्यायामशाळा बांधणे. ७ लाख
तिर्लोट धांबुर्लेमळा ३३ लाख ,
तिर्लोट आंबेरी जुनीशाळा ते हनुमान मंदिर मयेकर घरापर्यंत डांबरीकरण करणे.
रुपये १३ लाख
आंबेरी ब्रीज ते हनुमान मंदिर (जनसुविधा) १० लाख
आंबेरी मधलीवाडी जेटीबांधणे ४५ लाख
आंबेरी नविन स्मशानभूमी बांधणे ७.५ लाख
यावेळी माजी बांधकाम सभापती संजय बोंबडी, सरचिटणीस रामकृष्ण जुवाटकर, अंकुश टुकरुल,भुषण बोडस , तिर्लोट सरपंच सौ.रितिका जुवाटकर , ग्रा.पं. सदस्य कल्पेश घाडी, ग्रा.पं. सदस्य सौ. सान्वी तिर्लोटकर, ग्रा.पं. सदस्य आचल जुवाटकर तसेच अनिल तिर्लोटकर, महेश घाडी, अनंत घाडी, दिपक जुवाटकर, रवी घाडी, माजी उपसरपंच प्रताप तिर्लोटकर,इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
तिर्लोट गावातील प्रथम नागरीक सरपंच सौ.रितिका जुवाटकर व ग्रा.पं.सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने
आमदार नितेश राणे यांचे आभार मानले गेले.