शिवसेनेकडून दीविजा वृध्दाश्रमात अन्नदान व फळे वाटप

कणकवली दि.१४ जानेवारी (भगवान लोके)

शिवसेना नेते तथा सिंधू रत्न विकास योजनेचे संचालक किरण सामंत यांच्या वाढदिवसा निमित्त असलदे येथील दीविजा वृध्दाश्रमाला अन्नदान व फळे वाटप करण्यात आली.

या आश्रमातील एकूण 50 आजी आजोबांना यावेळी अन्नदान करण्यात आले. तसेच, विविध प्रकारची फळे वाटप करण्यात आली. सामाजिकता जोपासत आपल्यातील माणूसपणाला जागते ठेऊन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्गचे दानशूर व्यक्तिमत्व रुपेश सामंत, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, कणकवली तालुका प्रमुख शरद वायंगणकर, महिला उप जिल्हा प्रमुख नंदिनी पराडकर, तळे रे ग्रामपंचायत सदस्य शर्वरी वायंगणकर, पिंट्या देसाई, मधुकर पवार तसेच दीविजा वृध्दाश्रमाचे संदेश शेट्ये आणि कर्मचारी उपस्थित होते.