लीलाधर हडकर स्मृतिप्रित्यर्थ स्मृतिलिला पुरस्काराचे मानकरी जाहीर

मालवण,दि.१५ मार्च

सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवण आणि मालवण स्पोर्टस् असोसिएशन आयोजित हडकर कुटुंबियांतर्फे देण्यात येणाऱ्या नंदिता राजेश पाटील पुरस्कृत लीलाधर हडकर स्मृती स्मृतिलिला पुरस्काराचे मानकरी जाहीर करण्यात आले असून पुरस्कार वितरण सोहळा दि. १७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता येथील लिलांजली हॉल, भरड येथे होणार आहे.

कै. लीलाधर गणेश हडकर यांचे समकालीन असलेल्या उत्कृष्ट क्रीडापटूंना हा पुरस्कार देण्यात येतो. तसेच उदयोन्मुख क्रीडापटूंनाही स्मृतिलिला पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावेळी क्रिकेटपटू सुरेश उर्फ छोटू राजाराम मयेकर, ७० च्या दशकात पंच म्हणून भूमिका बजावणारे विनायक दत्तात्रय मयेकर, व्हॉलीबॉलपटू तथा हॉटेल व्यावसायिक विलास महादेव सामंत, उदयोन्मुख क्रिकेटपटू पियुष राजेश वस्त, टेबल टेनिसपटू इशांत वेंगुर्लेकर, बॅडमिंटनपटू गौरव राजेश पराडकर यांचा स्मृतिलिला पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ पिंटो, मालवण स्पोर्टस् असोसिएशनचे अध्यक्ष रामा शेटये आणि ज्येष्ठ क्रीडापटू देवदत्त उर्फ भाऊ हडकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल भंडारी हितवर्धक संस्था, मालवणतर्फे करण्यात आले आहे.