देवगड,दि.१५ मार्च
गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती देवगड येथे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीराच आयोजन करण्यात आल होते .
गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या वाढदिवसानिमित्त अधिकारी , कर्मचारी , व लोकप्रतिनिधींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी रोजच्या धावपळीच्या जीवनात कर्मचारी वर्गाचा आरोग्य कडे होणारा दुर्लक्ष लक्षात घेता वाढदिवसानिमित्त आरोग्य बाबत मार्गदर्शन व आरोग्य शिबीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ .उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आरोग्य विस्तार अधिकारी श्रीम . प्रतिमा वळंजु यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले .
या शिबीरात पंचायत समिती देवगड अधिकारी , कर्मचारी , ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक , शिक्षकवृंद यांनी सहभाग घेतला याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाणे , कक्ष अधिकारी संतोष बिर्जे , प्रकल्प अधिकारी देवगड बाबली होडावडेकर ,विस्तार अधिकारी निलेश जगताप , विस्तार अधिकारी अंकुश जंगले ,अधिक्षक कुणाल मांजरेकर , अधिक्षक मेधा राणे , कृषि अधिकारी दिगंबर खराडे ,लेखाधिकारी रमेश उपलवार , ग्रामसेवक देवगड अध्यक्ष संगिता राणे , ग्रामसेवक पाडुरंग शेटगे , सचिन जाधव सर , मधुसुदन घोडे , आरोग्य पर्यवेक्षक जी .डी. अडुळकर , कनिष्ट सहाय्यक नितीन कोयंडे , गटसमन्वयक वैशाली मेस्त्री , पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर आदी उपस्थित होते.
.