तारकर्ली येथील केरकर रापण संघ मांगर ते समुद्रकिनारा रस्ता कामाचा शुभारंभ

मालवण,दि‌ १५ मार्च

तारकर्ली मधलीवाडी ते केरकर रापण संघ मांगर ते समुद्रकिनारा या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक परशुराम टिकम यांच्या हस्ते करण्यात आला.

तारकर्लीच्या तत्कालीन सरपंच सौ. स्नेहा केरकर आणि ग्रा. प. सदस्य डॉ. जितेंद्र केरकर यांनी केलेल्या पाठपुराव्यातून तारकर्ली मधील केरकर रापण संघ मांगर ते समुद्रकिनारा रस्ता काँक्रिटीकरण करणे, तारकर्ली स्मशान भूमी ते ते समुद्रकिनारा रस्ता काँक्रिटीकरण करणे, तारकर्ली खाडी किनारी हॉटेल मनाली नजीक बंदर जेटी दुरुस्ती करणे, रतिलाल तारी बंदर जेडी ते देवली बंधारा ही कामे मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी केरकर उभयतांचे आभार मानले.

यावेळी परशुराम टिकम डॉ. जितेंद्र केरकर, अनिल जोशी, संजय केळुसकर, नंदकिशोर टिकम, नरेश कांदळगावकर, जितेंद्र बटा, रजनी कांदळगावकर, कु. मोरजकर हेमंत टिकम, रमेश टिकम, अमित टिकम, लक्ष्मण मळेकर, विजय कुबल, वासुदेव परब, बबन बांदेकर, हरेश जोशी, बाळ धुरी, निलेश टिकम, गोपाळ पडते, किरण केळुसकर, दीपक देऊलकर, योगेश देऊलकर, नंदू जोशी, दिलीप टिकम, गावकर तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.