देवगड जामसंडे नगरपंचायत व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर मंदिर परीसर व समुद्रकिनारा येथे स्वच्छता अभियान

देवगड,दि‌ १५ मार्च
देवगड जामसंडे नगरपंचायत व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १३ मार्च, २०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजतां कुणकेश्वर मंदिर परीसर व समुद्रकिनारा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्वच्छता अभियानामध्‍ये देवगड तहसीलदार .श्रीकृष्ण ठाकुर, देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी .सुरज कांबळे प्रशासकिय अधिकारी श्री. रोहित पाटील कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच महेश ताम्हणकर माजी सरपंच चंद्रकांत घाडी उपसरपंच ग्रा प सदस्य व ग्रामसेवक गुणवंत पाटील नगरपंचायत कर्मचारी, तलाठी, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ सहभागी होते.