खास.विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त किर्लोस बुधावळे असरोंडी या गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

मालवण, दि‌. १५ मार्च

रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली मालडी जिल्हा परिषद मतदार संघातर्फे ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी असगणी येथील रामेश्वर मंदिरात विजयी संकल्प अभिषेक करून येत्या निवडणुकीत खासदार राऊत यांना या जि. प. मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. तसेच विभागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला. अशाच प्रकारे किर्लोस बुधावळे असरोंडी या गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आडवली मालडी विभाग प्रमुख दीपक उर्फ बंडू चव्हाण सरपंच साक्षी चव्हाण, अरुण लाड, आडवली सरपंच संदीप आडवलकर, अरुण लाड, राठीवडे सरपंच दिव्या धुरी, उपसरपंच स्वप्निल पुजारे, श्रावण सरपंच नम्रता मुद्राळे, माजी सरपंच रामचंद्र राऊत, सुविधा परब, देवेंद्र पुजारे, मनोहर कासले, चंद्रकांत घाडी, लवू मेस्त्री, संदेश धुरी, अर्चना महाजनी, यशवंत राऊत, चंद्रकांत कासले, सुरेश बाईत, रमेश कासले, अनिल गावकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छासह आगामी लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देऊन पुन्हा एकदा दिल्ली दरबारी पाठवण्याचा विजयी संकल्प यावेळी श्री देव रामेश्वराच्या साक्षीने शिवसैनिकांनी केला.