नव्या आणि जुन्या गाण्यांच्या तालावर अवघ्या तरुणाईने धरला ठेका

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी गाणे सादर करताच टाळ्या अन् शिट्या;कणकवलीकरांनी मनमुराद आनंद घेत केली तुफान गर्दी..

कणकवली दि.१४ जानेवारी(भगवान लोके)

कणकवली पर्यटन २०२४ निमित्ताने इंडियन आयडॉल फेम मराठी सुप्रसिद्ध गायिका सायली कांबळे, गायक आशिष कुलकर्णी, निहाल तौरो यांनी तिसऱ्या रात्री हिंदी मराठी गाणी सादर करीत महोत्सवात रंगत आणली.गायकांनी नव्या आणि जुन्या गाण्यांचे उत्तम सादरीकरण केल्याने तालावर अवघ्या तरुणाईने ठेका धरला.कणकवलीकरांनी मनमुराद आनंद घेत तुफान मोठी गर्दी केली होती.

समीर नलावडे यांनी गाणं सादर करीत कणकवलीकरांची मने जिंकली…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ‘पहिला नशा… पहिला खुमार..’ हे गाणं सादर करीत कणकवलीकरांची मने जिंकली.तसेच सुप्रसिद्ध गायिका सायली कांबळे हिने ‘जरा परेशान’, ‘हमारी अधुरी कहाणी’, ‘बाहो मै चले आ’, ‘कभी कभी मेरे दिले मै’, ‘अजीब दास्ताँ है’, ‘ऐ श्याम मस्तानी’, ‘ऐ दिल कहाँ तेरि मंज़िल’, ‘पल पल दिल के पास’, ‘पहिला नशा… पहिला खुमार..’, ‘लैला वो लैला’, ‘चंद्रमुखी’, ‘चांदणी की रात्र’, ‘पिया तु अब तो आजा’, ‘दम मारो दम यासह हिंदी व मराठी गाण्यांचे सादरीकरण करत आपल्या आवाजाची भुरळ कणकवलीतील रसिकांना घातली.

गायक आशिष कुलकर्णी हिंदी मराठी गाण्यांचा तडका..

गायक आशिष कुलकर्णी याने ‘मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते’, ‘तु हिरे, तु हिरे’, ‘सच कह रहा है दीवाना दिल, दिल ना किसी से लगाना’, सैराट चित्रपटातील ‘याड लागलं’, ‘जिव दंगला, गुंगला, रंगला असा’, ‘देखा न हाय रे सोचा न हाय रे रख दी निशाने पे जाँ’, ‘बचना ए हसिनो’, ‘खाईके के पान बनासर वाला’, ‘रंग बदल रहे तितलिया, ‘ओ दिवानी’, ‘मैरे सपनो कि राणी कब आयेगी’, ‘यमला पगला दिवाना’ यासह मराठी व हिंदी गाणी गात महोत्सवात चांगलाच तडका दिला.

प्रेक्षक बेधुंद..

तसेच गायक निहाल तौरो याने ‘खामोशियाँ आवाज़ है, तुम सुनने तो आओ कभी’ अशी अनेक मराठी व हिंदीतील गाणी सादर करत कणकवली महोत्सवात प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडले.गायकांनी एकत्रित ढोल बाजे यासह मराठी व हिंदी गाण्याचे सादरीकरण करीत तरुणाईसह प्रेक्षकांना बेधुंद करून सोडले. यावेळी गायकांच्या आवाहनानंतर कणकवलीकरांनी आपल्या मोबाईलचा फ्लॅश ऑन प्रतिसाद दिला. तसेच या कार्यक्रमात सायली कांबळे, आशिष कुलकर्णी, निहाल तौरो यांनी एकापेक्षा एक हिंदी व मराठी गाणी सादर केले.