देवगड,दि.१५ मार्च
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून रामेश्वर येथिल श्री देव रामेश्वर मंदिरात जिल्हा परिषद पुरळ विभागाच्यावतीने विजयी संकल्प अभिषेक सोहळा पार पडला. यावेळी खासदार विनायक राऊत पुन्हा एकदा दोन लाख मताधिक्याने विजयी होतील हा विश्वास व्यक्त करताना त्यांना निरोगी उदंड आयुष्य लाभो अशी रामेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी विभाग प्रमुख संदीप डोळकर, मा. जि. प. सदस्य वर्षा पवार, रामेश्वर सरपंच मोनिका टुकरूल, ऊप सरपंच मिनेश ठुकरुल, संतोष ठुकरुल, सचिन खडपे, संतोष मणचेकर, दिपक पुजारे, अभि जावकर, व अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.