देवगड,दि.१६ मार्च
तालुक्यातील साळशी गावामध्ये कोकणचे भाग्यविधाते केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री ना.नारायण राणे साहेब यांच्या खासदार निधीतून साळशी मुख्य रस्ता ते देवानेवाडी पर्यंत रस्ता खडीकरण -डांबरीकरण करणे या कामासाठी 10 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले.सदर रस्त्याचे भूमिपूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री.संदीप साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी पं.स.सदस्य सुनील गावकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संदीप साटम म्हणाले कि भाजपा सन्मा.आमदार नितेशजी राणे यांच्या माध्यमातून साळशी गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न विविध विकास कामांच्या माध्यमातून करत आहे .सूज्ञ मतदार आणि ग्रामस्थांनी त्याला सकारात्मक साथ देणे गरजेचे आहे आणि ते या लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून दिसेल हा विश्वास बोलून दाखवला.यावेळी राजेंद्र शेट्ये ,वैभव साळस्कर ,सुनील गावकर ,सत्यवान सावंत,राजेंद्र साटम ,रविकांत सावंत,प्रवीण राणे इत्यादी ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर रस्ता खूपच खराब झाला होता.रस्ता नूतनीकरणामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.