माजी खासदार डॉ निलेश राणे कर्तृत्ववान, दमदार आणि कणखर नेतृत्व असून त्यांचा स्पष्टवक्तेपणा आवडतो

निलेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा-देश उपाध्यक्ष, उद्योजक विशाल परब 

सावंतवाडी,दि.१६ मार्च 
माजी खासदार डॉ निलेश राणे कर्तृत्ववान, दमदार आणि कणखर नेतृत्व असून त्यांचा स्पष्टवक्तेपणा आवडतो. त्यांनी तरुण खासदार म्हणून आपला ठसा संसदेत ,जनतेत उमटवला आहे. त्यांच्या सहवासात आलेल्यांची आठवण ते सदैव काढतात. जीवाला जीव लावणाऱ्या निलेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यानिमित्ताने देत आहोत असे भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, उद्योजक विशाल परब यांनी सांगितले.
भाजप चे प्रदेश सचिव डॉ निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विशाल परब यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,मी आणि विशाल परब मित्र मंडळ वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम सुरू ठेवू. आचारसंहितेपूर्वी गोरगरिबांना कपडे, धान्य वाटप करत आहोत. आचारसंहितेमुळे उपक्रम हाती घेता येत नाहीत त्यामुळे आचारसंहितेनंतर समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊ.
विशाल परब म्हणाले, डॉ निलेश राणे यांच्या मुळे मी आणि विशाल परब मित्र मंडळ घडलो. त्यांना विसरणार नाही. त्यांची आठवण सदैव राहील.डॉ. निलेश राणे यांचे कणखर नेतृत्वाखाली सन २००९ पासून माझ्यासह असंख्य तरुण घडत गेलो .निलेश राणे यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत म्हणून शुभेच्छा देताना समाज उपयोगी कार्यक्रमासोबत शैक्षणिक व लोकांना आवडणारे कार्यक्रम निश्चित घेतले जातील .
यापूर्वी मी आणि विशाल परब मित्र मित्र मंडळ, भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने शिवगर्जना महानाट्य, राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धा, ॲम्बुलन्स वाटप असे अनेक उपक्रम हाती घेतले होते. मात्र आज आचारसंहितेमुळे कार्यक्रम घेता येत नसले तरी निलेश राणे यांची स्वप्नपूर्ती होण्यासाठी आम्ही सतत त्यांच्या पाठीशी झोकून देऊन काम करू, असे विशाल परब यांनी सांगितले.

कोकण भूमीच्या विकासासाठी ,रोजगार व व्यवसाय निर्मितीसाठी आम्ही मेहनत करू त्यांना साथ देऊ तसे परब यांनी सांगितले.
सन २००९ पासून निलेश राणेंसोबत मी आहे माझ्यासह अनेक तरुण त्यांच्यासोबत होते आजही त्यांची आठवण निलेश राणे काढतात निलेश राणे यांचा रोखठोक, दमदार आणि कणखर नेतृत्वासोबतच स्पष्टवक्तेपणा सर्वांना आवडतो. त्यांचा हळवा व गोड स्वभाव त्यांच्यासोबत असणाऱ्या प्रत्येकाने अनुभवला आहे. त्यांनी आपल्या मनाप्रमाणे वाटचाल केली तर त्यांची घौडदौड कोणीही रोखू शकत नाही. त्यांचा स्वभाव पोटात एक आणि ओठावर दुसरं असा नाही. त्यांचा स्पष्टवक्तेपणा स्वभाव हा सर्वांनाच आवडतो. त्याहीपेक्षा जीवाला जीव ते देतात, ते नेते म्हणून आम्हाला त्यांची पदोपदी जाणीव झालेली आहे , असे विशाल परब यांनी सांगितले.

श्री परब म्हणाले, सध्या निलेश राणे यांनी कुडाळ मालवण मतदारसंघात झोकून दिले आहे. त्यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे. ते सतत कार्यरत असून परिवर्तन आणि नवनिर्माण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न जवळुन पाहत आहे. त्यामुळे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास वाटतो.मी माणगाव खोऱ्यातील आहे माणगाव खोऱ्यातील मतदान त्यांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून अहोरात्र मेहनत घेतली जाईल. तरुण तडफदार निलेश राणे यांचे दमदार, कणखर व स्पष्टवक्तेपणा नेतृत्व आम्हा सर्वांना आवडते. तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही आवडते तेही.

श्री परब म्हणाले, निलेश राणे यांनी कुटुंबात मोठा भाऊ म्हणून दमदार, कर्तृत्ववान, कणखर पणाचा पावलोपावली ठसा उमटवला आहे. लोकांच्या हाकेला धावणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.आमचं आदरस्थान केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या नेतृत्वाची तडफदार साथ ते जोपासत आहेत. तरुणपणातच युवकांना भुरळ पडल्याने आज मोठ्या प्रमाणात युवक त्यांच्यासोबत आहेत तसेच विकासाच्या दृष्टिकोनातून ते आज कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने सतत तळमळीने काम करत आहे हे सर्वांनाच भावत असून त्यांनी आलेल्या प्रसंगातून आपल्या स्वभावात बदल घडवून नवनिर्मितीसाठी चालवलेली वाटचाल नक्की यशस्वी होईल असा विश्वास मला वाटतो, असे विशाल परब यांनी बोलताना सांगितले.