मालवण,दि.१६ मार्च
मालवण वायरी येथील कुलस्वामिनी केळबाई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त १४ ते १६ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. महापुरुष भजन मंडळ-भोगवेचे बुवा तुषार खुळे यांचे भजन, सायंकाळी ७ वा. दत्त भजन मंडळ, मुंबईचे बुवा भगवान लोकरे (पखवाज-विजय सावंत) व पावणादेवी भजन मंडळाचे बुवा प्रमोद हर्याण (मृदुंग- रवी मेस्त्री) यांच्यात डबलबारी भजन सामना, १५ रोजी सकाळी ८ वा. पालखी मिरवणूक, दुपारी १२ वा. पूजा, १२.३० वा. १०८ अभिषेक, आरती, ओटी भरणे, २ वा. महाप्रसाद, ४ वा. सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वा. केळबाई देवी भजन मंडळ बुवा शरद मयेकर यांचे भजन, रात्री ९ वा. आरती, ९.३० वा. रेकॉर्ड डान्स, १६ एप्रिल रोजी ९ वा. १०८ सामूहिक अभिषेक, होमहवन, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. गायन कार्यक्रम, रात्री ९ वा. आरती, १० वा. पालखी प्रदक्षिणा, ११ वा. दत्त माऊली दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.