आचरा,दि.१६ मार्च(अर्जुन बापर्डेकर)
आचरा पिरावाडी भागात कमी दाबाने होणारा वीज पुरवठा तसेच अन्य वीज समस्यांबाबत नवीन विद्यूत जनित्राची मागणी करण्यात येत होती. याचा विचार आचरा सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत आचरा समुद्र किनारी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून करून घेतला. त्याचा भूमिपूजन सोहळा सरपंच जेरोंन फर्नांडिस सदस्य मुजफ्फर मुजावर सौ पुर्वा तारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर ठेकेदार गणेश गोवेकर , लवू मालडकर ,नाना कांदळगावकर अजय कोयंडे, जीवरक्षक अक्षय वाडेकर , भोलानाथ तळवडकर, विठ्ठल धुरी ,वायरमन पिंट्या साळकर, मंगेश परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Home आपलं सिंधुदुर्ग पिरावाडी गावाच्या विजेचा प्रश्न मार्गी, आचरा समुद्रकिनारी नवीन ट्रान्सफॉर्मर बसणार