देवगड,दि.१६ मार्च
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील भटवाडी पिंपळपार ते राममंदिर रस्त्याला आधार भिंत बांधणे या रु ७९,७८,८६०/-खर्चाच्या विकास कामाचा शुभारंभ गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या हस्ते शनिवारी सकाळी करण्यात आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शिवसेना नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने हा निधी मंजूर करण्यात आला आहे.या वेळी शिवसेना देवगड शहराध्यक्ष पि टी पेडणेकर,ग्रामस्थ शरद गोळम,सुरेश गोळम,पांडुरंग कणेरकर,चंद्रकांत सावंत,माधव गोळम,नरेश गोळम,गुरू लाड,श्रीकृष्ण रानडे,व अन्य उपस्थित होते.
Home आपलं सिंधुदुर्ग देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील भटवाडी पिंपळपार ते राममंदिर रस्त्याला आधार भिंत बांधणे...