देवगड येथे बाल आनंद व महिला मेळावा संपन्न

देवगड,दि.१६ मार्च

एकात्मिक बालविकास सेवा योजना देवगड आयोजित महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत महिला मेळावा , बाल आनंद मेळावा इंद्रप्रस्थ सभागृहात सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने व प्रकल्प अधिकारी देवगड बाबली होडावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
या महिला मेळाव्यात सहाय्यक संरक्षण अधिकारी मेधा लवु वज्राटकर यांनी कोंटुबिक हिंसाचार कायदा २००५ व बालसंगोपन योजना बाबत माहिती दिली तसेच सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग समुपदेक्षक अॅड मिनाक्षी नाईक यांनी कायदेविषय माहिती ,सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग स्टाप नर्स स्नेहा मोरे यांनी आरोग्यबाबत माहिती तर शिरगांव प्राचार्य रश्मी हिर्लेकर यांनी महिला सशक्तिकरण बाबत माहिती दिली .
या आनंद मेळाव्यात सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने व कक्ष अधिकारी . संतोष बिर्जे यांनी मार्गदशन केले . तर प्रकल्प अधिकारी बाबली होडावडेकर यांनी लेक लाडकी योजनाबाबत माहिती दिली .
बाल आनंद मेळाव्यात बालकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेत रसिकांची मने जिंकली त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आले .पोषण पंधरावडा अंतर्गत शैक्षणिक साहित्य शाळा पुर्व तयारी व पौष्टीक पाककृतीचे विविध पदार्थाचे १६ स्टॉल उभारण्यात आले होते .
या मेळाव्यात व्यासपिठावर मुख्यसेविका सुवर्णा भगत , मुख्यसेविका पुजा सावंत , मुख्य सेविका राखी राणे , माजी सभापती अमित साळगांवकर , आरे सरपंच ममता कदम , तळवडे ग्रामपंचायत सदस्य माणसी माणगांवकर , कनिष्ट सहाय्यक कमलेश गावडे, प्रफुल्ल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .
या आनंद मेळाव्याला ग्रामपंचायत महिला सदस्य , सरपंच , अंगणवाडीसेविका व पालक , बालके उपस्थित होते .
या आनंद मेळाव्यात प्रस्तावणा मुख्यसेविका सुवर्णा भगत तर सुत्रसंचालन मुख्यसेविका पुजा सावंत व आभार प्रकल्प अधिकारी बाबली होडावडेकर यांनी मानले .