लोकसभा निवडणुकीपूर्वी विविध विकास कामांची भूमिपूजने

देवगड,दि.१६ मार्च

आमदार नितेश राणे साहेब यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील तोरसोळे गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने भाजपा जिल्हा सरचिटणीस . संदीप साटम यांच्या हस्ते संपन्न झाला
आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यामध्ये ८०० कोटी रुपये एवढा मोठा निधी विविध माध्यमातून आणला त्यामुळे देवगड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विकास कामांच्या रूपाने महायुती सरकारच्या काळात लोकांची मागणी असलेली विकास कामे पूर्ण होताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज तोरसोळे गावामध्ये विकास कामांचा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यात पूर्ण प्राथमिक शाळा तोरसोळे सभागृह बांधणे.
ग्रामपंचायत विस्तारीकरण करणे.
तोरसोळे ब्राह्मण देवभाटी शेतपाट बांधणे.
राणेवाडी तेलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.
तोरसोळे आंबोळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे.
तोरसोळे जुवळेवाडी बंधारा बांधणे.
गणपती मंदिर ते दिगंबर पवार यांच्या घरापर्यंत पायवाट बांधणे.
यावेळी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तोरसोळे गावातील प्रथम नागरीक सरपंच सौ. तेजस्विनी पवार व ग्रा.पं.सदस्य देवदत्त कदम, सुरेश हरम, अरविंद पवार, सुहास राणे. दिलीप राणे,सुनील राणे,रामचंद्र राणे, चंद्रकांत राणे, एकनाथ चव्हाण, प्रवीण तेली,सुधीर कडव ,विजय सावंत,मोहन सावंत,अनंत कडव,मनीषा सावंत ,सुवर्णा कडव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने
आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.