वैभववाडी दत्त मंदिर येथे शिवसेना नेते अतुल राव राणे यांनी केला अभिषेक

खासदार विनायक राऊत लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय होऊ दे

वैभववाडी,दि.१६ मार्च

खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाच्ने औचित्य साधून वैभववाडी दत्त मंदिरात शिवसेनेचे नेते
अतुलजी रावराणे यांनी अभिषेक केला. येणा-या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानी विजयी होऊ दे असं साकडं
देवाला घातलं.
खा. राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील मंदीरांमध्ये अभिषेक करण्यात आले. शहरातील दत्त मंदिरात अतुल
रावराणे यांच्या हस्ते अभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी तालुका अध्यक्ष मंगेश लोके, शहर प्रमुख शिवाजी राणे,
नगरसेवक रणजित तावडे, मनोज सावंत माजी सभापती लक्ष्मण रावराणे, रोहन रावराणे, स्वप्नील रावराणे, युवराज
रावराणे, विठोजी पाटील यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.