बांदा,दि.१६ मार्च
रविवार उद्या/आज दिनांक 17 रोजी डेगवे ग्रामस्थ व मित्रमंडळ यांच्यावतीने रात्री ठीक 9 वाजता अश्रूंची झाली फुले हे तीन अंकी सामाजिक , कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाटक डेगवे श्री देवी माऊली मंदिर नजीक रंगमंचावर होणार आहे. येथील श्री स्थापेश्वर कला क्रीडा मंडळाचे स्थानिक कलाकार या नाट्यप्रयोगात काम करणार आहेत. या नाटकाचे दिग्दर्शक एस व्ही नाईक, सहा दिग्दर्शक आबाजी सावंत, सूत्रधार दादा देसाई, नैपथ्य दिपज्योति रंगमंच अस्नोडा, पाश्वसंगीत महेंद्र मांजरेकर, रंगभूषा दीपक बर्वे, ध्वनी संकलन अविनाश सावंत, वेशभूषा मनोज देसाई, कलाकार सचिन देसाई, अवंती पंडित, विनायक केसरकर, प्रकाश देसाई, भीमसेन देसाई, अनिल देसाई, विनय देसाई, दादा देसाई, रुपाली देसाई, राजेश देसाई, गजानन देसाई, सुशील देसाई, वैभव देसाई, सुमेध देसाई, प्रथमेश देसाई , शंकर देसाई, किरण देसाई, गोपाळ म्हसकर आदी कलाकारांचा समावेश आहे. तरी नाट्यरसिकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.