प्रादेशिक पर्यटन मधून आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली तालुक्याला पाच कोटी निधी मंजूर

कलमठ कलेश्वर मंदिर गार्डन सुशभीकरण करणे, ओसरगाव तलाव सुशोभीकरण करणे, हरकुळ तलाव सुशोभीकरण करणे,या कामांना मंजुरी; भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या पाठपुराव्याला यश

कणकवली दि.१६ मार्च(भगवान लोके)

तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी आ. नितेश राणे प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नातून कणकवली विधानसभा मतदारसंघातील कणकवली तालुक्यातील नव्याने झालेल्या येथील कलेश्वर मंदिर कलमठ येथे गार्डन व परिसर सुशोभीकरण करणे तसेच कणकवली तालुक्यातील हायवे लगत असलेले व सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ओसरगाव तलाव व हरकुळ तलाव हे सुशोभीकरण यासाठी तब्बल पाच कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. पर्यटकांची वर्दळ वाढत हा भाग विकसित होत असताना गावातील स्थानिक लोकांना व्यवसाय निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून आमदार नितेश राणे यांनी l पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी लावून धरली होती. आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्याला दिलेला या पाच कोटीच्या निधीमुळे कलमठ ,ओसरगावं,हरकुळ ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं आनंदच वातावरण निर्माण झालं असून पर्यटन वाढीसाठी व कणकवली तालुक्याच्या विकासासाठी हे महत्त्वाचं पाऊल मानले जात असून आमदार नितेश राणे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. या कामासाठी भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, कलमठ उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, हरकुलळ,उपसरपंच सर्वेश दळवी यांनी विशेष मेहनत घेतली.