क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाच्यातर्फे १७ रोजी वधुवर परिचय मेळावा

कणकवली १६ मार्च (भगवान लोके)

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाच्या वधुवर सुचक समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही घाडीगांवकर वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे . सदर मेळावा रविवार १७ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ४ वाजता सुरेंद्र गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बिल्डींग, शारदा टॉकिजच्या बाजुस, दादर (पुर्व), मुंबई ४०० ०१४ येथे आयोजित करण्यात आला आहे .

या मेळाव्यांच्या वेळी घाडीगांवकर समाजातील बहुसंख्य वधुवर व पालक उपस्थित राहतात. मेळाव्याचे यंदाचे १९वे वर्ष असुन समाजातील उपवर युवा युवतीनी या संधीचा फायदा घ्यावा व आपला स्वप्नातला जोडीदार निवडावा. घाडीगांवकर वधुवर परिचय मेळावांमध्ये प्रत्यक्षरित्या चर्चा सत्राकरिता व्यासपीठ दिले जाते. याशिवाय समाजाच्या कळाचौकी , मुंबई येथील कार्यालयात दर मंगळवार व बुधवार या दोन दिवस वर्षभर वधुवर नोंदणी सुरु असते. याबाबतच्या अधिक माहितीकरिता समिती प्रमुख गजानन आ. घाडीगांवकर (९४०५३ ७९५८६), विकास शिवराम घाडीगांवकर (८८७९७७९९६५) रामचंद्र यशवंत घाडीगांवकर (९१६७७८७५९२) रमेश घाडीगावकर (९९६९५ ४७०६७) रघुनाथ घाडीगांवकर (९८६९६५४७६८) चंद्रकांत घाडी (८६५५४ ३४८९९) व शशिकांत महादेव घाडीगांवकर याच्याशी सर्पक साधावा असे आवाहन घाडीगांवकर समाज वधु वर सूचक समितीने केले आहे .