सावंतवाडी दि.१६ मार्च
सावंतवाडी दोडामार्ग व वेंगुर्ले विधानसभा मतदारसंघात दोन लाख २२ हजार ३८३ मतदार नोंदणी झाली असून यामध्ये पुरुष मतदार एक लाख ११ हजार ६३५ तर महिला मतदार एक लाख १० हजार १७९ आहेत.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी, दोडमार्ग व वेंगुर्ला असे तीन तालुके येतात. या तिन्ही तालुक्यांमध्ये दोन लाख २२ हजार ३८३ मतदार आहेत. पुरुष मतदार एक लाख ११ हजार ६३५ तर महिला मतदार १ एक लाख दहा हजार १७९ आहेत.
वेंगुर्ले तालुक्यात एकूण ६६ हजार १७९ मतदार असून त्यात पुरुष ३३ हजार १२७ व स्त्री ३३ हजार ०५२ मतदार आहे. सावंतवाडी तालुक्यात एक लाख १६ हजार ८३ मतदार असून पुरुष मतदार ५८ हजार ५०६ तर महिला मतदार ५७ हजार ५७७ आहेत . दोडामार्ग तालुक्यामध्ये ३९ हजार ५५३ मतदार आहेत त्यात पुरुष वीस हजार दोन व महिला १९, हजार ५५० मतदार आहेत. याशिवाय सैनिकी मतदार पुरुष ५५० व महिला १९ मतदार आहेत
तसेच ८५ वर्षापेक्षा जास्त मतदार ३ हजार ६७४ या मतदारसंघात आहेत. त्यात वेंगुर्ले १३९३, सावंतवाडीत १५०८ तर दोडामार्ग मध्ये ८४८ आणि शंभर पेक्षा जास्त वयाचे मतदार वेंगुर्ले मध्ये २७, सावंतवाडी मध्ये ७२, व दोडामार्ग मध्ये ५० मतदार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची २३ जानेवारी २०२४ ची मतदार नोंदणी असल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.