आ. नितेश राणेंनी अपघातग्रस्त जखमीची गाड्यांचा ताफा थांबवत केली विचारपूस..

रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत उपचारासाठी केले दाखल..

कणकवली दि .१४ जानेवारी(भगवान लोके)

: वैभववाडी तळेरे मार्गावर अपघातग्रस्त जखमी तरुणाला पाहून आमदार नितेश राणेंनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला आणि जखमी तरुणाची विचारपूस करून तात्काळ रुग्णवाहिका मागवून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नाधवडे येथील बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहून आमदार नितेश राणे आज सायंकाळी ४ वाजता कणकवली कडे येत होते. नाधवडे दूध डेअरीच्या नजीक राणे यांच्या गाड्यांचा ताफा आला असताना त्यांना रस्त्यात जखमी अवस्थेत विव्हळत पडलेला तरुण दिसला. त्याच्या मोटारसायकल ठोकून अज्ञात वाहनाने पलायन केले होते . अपघातग्रस्त तरुणाला पाहताच आमदार नितेश राणेंनी तात्काळ आपली गाडी थांबवून त्या तरुणाची विचारपूस करत त्याला रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत उपचारासाठी दाखल केलं.