दोडामार्ग, दि. १६ मार्च
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात वन विभाग तसेच खाजगी राखीव जंगल मोठ्या प्रमाणात आहे. यात मोठ्या प्रमाणात जंगली वन्य प्राणी यांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी पट्टेरी वाघांची संख्या देखील मोठी आहे. मांगेली कर्नाटक सीमेवर काळ्या बिबट्या ( बॅल्क पत्थर) देखील काही वर्षापूर्वी आढळून आला होता. शनिवारी दोडामार्ग येथील शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस इतर कार्यकर्ते हे कुंभवडे येथे रस्ता भूमीपूजन करण्यासाठी जात असताना रस्ता शेजारी पाणी कमी झालेल्या छोट्या नाल्यात पट्टेरी वाघ आढळून आला. त्यांनी मोबाईल मध्ये फोटो चिञित केले तर काही सेकंद व्हिडिओ काढला नंतर हा वाघ बाजूला सरकारला या वाघाला पाहून सुरुवातीला सर्वांची भंबेरी उडाली काचा बंद केल्या. या ठिकाणी वाघाचे दर्शन घडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.