तळवडेतील आरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद !

राजापूर,दि.१७ मार्च
तळवडे शाळा नं. २ च्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून तळवडे आंबेवाडी येथील आरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद लाभला. सुमारे २०० रुग्णानी याचा लाभ घेतला.
या शिबीराचे उदघाटन सरपंच सौ. गायत्री साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाचल सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, माजी सरपंच सौ. अपेक्षा मासये, अमृत महोत्सव समिती अध्यक्ष सुनील लिंगायत, कार्याध्यक्ष मंगेश रबसे, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी रबसे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, जगन्नाथ कलमस्टे, संतोष खानविलकर, नंदकुमार पळसुळेदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. ्
मुख्याध्यापक अनाजी मासये यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. चिपळूणच्या वालावलकर हाॅस्पीटलच्या तज्ञ डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली. तपासणी दरम्यान सुमारे १५ रूग्णांची अल्प दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शैक्षणिक उपक्रम राबवीत असताना पालकांच्या आरोग्याची देखील काळजी घेऊन आरोग्य शिबिरासारखा उपक्रम आयोजित केल्याबद्दल उपस्थितानी महोत्सव समिती व मुख्याध्यापक अनाजी मा सये यांचे कौतुक केले. यावेळी सुरेश गुडेकर, देसाई, मासये मॅडम यांनी या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.