कणकवलीकरांना आनंद देणारा हा पर्यटन महोत्सव – ना. नारायण राणे..

0

तरुणांनी उद्योगात मेहनत करीत उभारी घेतली पाहिजे ;कणकवली पर्यटन महोत्सवाची सांगता .

 

कणकवली दि.१४ जानेवारी (भगवान लोके)

कणकवली पर्यटन महोत्सवाचे सुंदर आयोजन आ. नितेश राणे,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी चांगले आयोजन केलं आहे.आता तुम्ही चांगले काम करीत आहात,तसेच जनतेची सेवा करा. माझा पाठलाग करताना पदाचा आणि गुणाचा करा.माझ्या पाठून तुम्हीही त्या दाराने आला पाहिजेत.कणकवलीकरांना आनंद देणारा हा महोत्सव आहे.मला एवढं सांगावेसे वाटतं मला कणकवलीने खूप काही दिलं,मी पहिली निवडणूक जिंकली ,त्यामुळे गेली ३४ वर्षे पदावर राहिलो आहे,असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं.

कणकवली पर्यटन महोत्सव २०२४ सांगता सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,भाजपा उपाध्यक्ष बंडू हर्णे,भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत,अभिनेता दिगंबर नाईक,संदीप मेस्त्री मिलिंद मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ना.राणे म्हणाले,आपण २१ व्या शतकात आहोत,जगाचा अर्थव्यवस्थेत भारत ११ व्या नंबर वरुन नरेंद्र मोदी यांच्यामुळे ५ व्या नंबरवर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तिसऱ्या नंबर वर भारताला नेण्याचा संकल्प केला आहे.कोकण आणि राज्य आणि देशाचे उत्पन्न वाढेल.कोकणात उद्योजक वाढले पाहिजेत.तरुणांनी उद्योगाकडे वळले पाहिजे.उद्योगातून समृध्दी आणि उज्ज्वल भविष्य घडवल पाहिजे.प्रगतीकडे चला..बाजूला गोवा आहे.दरडोई उत्पन्न साडेचार लाख आहे, आपलं दोन लाख चाळीस हजार आहे.तरुणाने व्यवसायाकडे जावे,फूड प्रोसेसिंग उद्योग वाढले पाहिजेत,असे आवाहन ना.राणे यांनी केले.

यावेळी सूत्रसंचालक श्याम सावंत,राजेश कदम यांचा सत्कार करण्यात आला.