वेंगुर्ला,दि.१७ मार्च
वेंगुर्ला नगरपरिषद कंपोस्ट डेपोमध्ये आगळ्या वेगळ्या संकल्पना राबविण्यात अग्रेसर असते. त्याचाच एक भाग म्हणून त्याठिकाणी केलेल्या शेतीतून घेण्यात आलेले उत्पादन पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
कच-याचे साम्राज्य असलेला कंपोस्ट डेपो फळाफुलांनी बहरला आहे. या ठिकाणी लाल भाजी, मका, भेंडी आदी भाजीपाला तसेच सूर्यफूल, झेंडू या सारख्या फुलझाडांची तर जाम, पेरू, पपई व चिकू आदी फळ झाडांचीही लागवड करण्यात आली आहे. येथे काम करणारे नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी या झाडांच्या जतन व संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले.