इन्सुली डोबवाडी येथे क्रशर वर आलेल्या कामगाराचा निगुडे राणेवाडी येथे झाडावरून पडून मृत्यू

बांदा,दि.१७ मार्च
इन्सुली डोबवाडी येथे क्रशर वर आलेल्या कामगाराचा निगुडे राणेवाडी येथे झाडावरून पडून मृत्यू झाला.
बिपीन विज्ञानुस एक्का (30, रा. झारखंड) असे त्याचे नाव आहे. मयत बिपीन एक्का हा शनिवारी येथे सिमेंट ब्लॉकचे काम करण्यासाठी आला होता मात्र शनिवारी तो न सांगताच निघून गेला असल्याचे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले. तर रविवारी सकाळी त्याचा निगुडे येथील एका आंब्याच्या झाडाखाली मृतदेह आढळला. याबाबत बांदा पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इन्सुली डोबवाडी येथील क्रशरवर सिमेंट ब्लॉकचे काम करण्यासाठी झारखंड येथील पाच कामगार शनिवारी आले होते. यातील मयत बिपिन हा तेथे आल्यापासूनच चलबिचल होता तो तिथे रहायला बघत नव्हता. तो शनिवारी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला बंद करून ठेवले मात्र तो रात्री तेथील नजीकच्या जंगलात पळून गेला त्याची शोधा शोध सुद्धा झाली. मात्र तो आढळून आला नाही. सकाळी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता निगुडे राणेवाडी येथील एका आंब्याच्या झाडाखाली त्याचा मृतदेह आढळून आला. तर त्या आंब्याच्या झाडावर त्याचे टॉवेल असल्याचे समोर आले
याबाबतची माहिती बांदा पोलिसांना देण्यात आली. यावेळी प्रभारी अधिकारी श्रीकांत इंगवले, सहा पोलीस उपनिरीक्षक सुनील पडवळ, कॉन्स्टेबल संभाजी देसाई, रोहित कांबळी यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल करण्यात आला येथील वैद्यकीय अधिकारी गजानन सारंग यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.