मालवणच्या निलरत्न या बंगल्यावर निलेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी
मालवण,दि.१७ मार्च
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सौ. निलम राणे यांच्या उपस्थितीत आज रात्रौ उशिरा मालवण च्या निलरत्न बंगल्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी केक कापत वाढदिवस साजरा केला. यावेळी जमलेल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळपासूनच मालवणच्या निलरत्न या बंगल्यावर निलेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर सायंकाळी या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सौ. निलम राणे द्वयी खास दिल्लीहून मालवण मुक्कामी आले होते . यावेळी निलेश राणे यांनी त्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी भाजपचे नेते दत्ता सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, सुदेश आचरेकर, बाळू कुबल, राजन सरमळकर, सूर्यकांत फणसेकर, अशोक तोडणकर, विकी तोरसकर, मंगेश गावकर, संतोष कोदे आदी तसेच इतर उपस्थित होते.
कुंभारमाठ येथून निलरत्न पर्यंत भव्य रॅली
भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मालवणात कुंभारमाठ ते नीलरत्न बंगला अशी केंद्रीय मंत्री नारायण राणे व निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली.
कुंभारमाठ येथे दत्ता सामंत यांच्या बंगल्याकडून या रॅलीस सुरुवात झाली. यावेळी बहुसंख्य भाजप कार्यकर्ते मोटारसायकल द्वारे रॅलीत सहभागी झाले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास केंद्रीय मंत्री नारायण राणे व निलेश राणे यांचे आगमन झाल्यावर या रॅलीस प्रारंभ झाला. कुंभारमाठ येथून देऊळवाडा, भरड ते बाजारपेठ मार्गे, फोवकांडा पिंपळ ते कचेरी रोड वरून चिवला बीच येथे राणे यांच्या निलरत्न बंगल्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान निलेश राणे यांनी कार्यकर्ते व जनतेच्या शुभेच्छा स्वीकारल्या.