संपदा फाळके आणि समृद्धी देवळेकर यांना स्वर्गीय मीनाताई ठाकरे जिवन गौरव पुरस्कार २०२४ जाहीर

देवगड,दि.१८ मार्च
संपदा संजय फाळके (जुडो) आणि समृद्धी सुधीर देवळेकर (पॉवर लिफ्टिंग) यांना स्वर्गीय मीनाताई ठाकरे जिवन गौरव पुरस्कार २०२४जाहीर.करण्यात आला. परेल येथील सुभाष डामरे मित्रमंडळ व शिवराज प्रतिष्ठान यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक १७ मार्च रोजी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार डॉ.शिरोडकर हायस्कूल येथे करण्यात आला होता त्यावेळी त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.त्याप्रसंगी नगरसेविका सिंधुताई मसुरकर, नगरसेविका लता रहाटे, भारती पेडणेकर, लालबाग राजा चे सुधीर साळवी आणि अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती ऋत्विका सरदेसाई पॉवर लिफ्टिंग आणि समर्थ व्यायाम मंदिराचे मल्लखांब पटू, जुडो पटू यांचा देखील सत्कार करण्यात आला.