आचारसंहिता लागू होताच देवगड-जामसंडे शहरांमध्ये पोलिसांचे संचलन

देवगड, दि.१८ मार्च
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच, देवगड पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी देवगड जामसंडे शहरात रूट मार्च काढला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड जमसंडे शहरात रूट मार्च सोमवारी सकाळी काढण्यात आला यामध्ये तीन पोलीस अधिकारी,४३ पोलीस अंमलदार उपस्थित होते .त्यांना रूट मार्च,निवडणूक आचारसंहितेबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.