६५ वर्षावरील मित्र-मैत्रिणींच्या खट्याळ ग्रुपचा स्नेहोत्सव उत्साहात संपन्न !

फोंडा हायस्कूलच्या ७४ – ७५ वर्षीच्या वर्गाचा वर्गातील मित्र- मैत्रिणींचा आनंदोत्सव !

फोंडाघाट, दि.१८ मार्च (संजय सावंत)
फोंडाघाट हायस्कूल च्या १९७४-७५ च्या 10 वी बॅच ची वयाच्या ६५ नंतरचे आयुष्य रिचार्ज करण्यासाठी वर्गमित्र-मैत्रिणी व त्यांच्या हास्य- विनोदात, आयुष्यातील सुखदुःखाच्या- अनुभवाच्या आठवणींची देवाणघेवाण, गाणी-बजावणी आणि उपजत कलागुणांच्या अविष्कारात फोंडाघाट च्या पूर्णानंद भवन येथे सलग दोन दिवस आनंदोत्सव साजरा करताना 65 च्या वृद्धांचे बालपण अनुभवयास मिळाले.
संध्याकाळच्या चहापानानंतर आनंदोत्सवाला प्रारंभ झाला. सूत्रसंचालन प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत कुमार नाडकर्णी यांनी केले.कर्जत पासून सुरू झालेल्या, साठी पार केलेल्या वर्गमित्र- मैत्रिणी परिवाराची वाटचाल आज पासष्ठी उलटल्यानंतरही त्याच, उत्साहात फोंडाघाट पूर्णानंद भवन येथे आपला पाचवा स्नेहोत्सव साजरा करताना चालू वर्षी मित्रांपैकी चौफेर व्यक्तिमत्व स्व.रवि बागवे, स्व.दत्ताराम लाड आणि स्व.सू.शा.सावंत यांच्या निधनामुळे ‘ बचपन के दोस्त ‘ मधील मित्रांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत ,दोन मिनिट शांतता पाळून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सुरू झालेल्या रंगारंग कार्यक्रमात नागेश तिरोडकर यांनी “ये नयन डरेs डरेss गीताने रंगत आणली. सौ. उज्वला कर्णिक यांच्या हनुमान चालीसा आणि त्यानंतर पंछी होती तो उड आती रे ss गाण्या ने धमाल आणली. सुरेश कुडतरकर ,बबन पवार, जया जाधव, सुरेश तळेकर यांचा वैयक्तिक जीवनातील संघर्ष ,आजची वाटचाल, आणि बदललेल्या शैक्षणिक व्याख्या यावरची कुमार नाडकर्णी यांनी घेतलेली खुसखुशीत मुलाखत सर्वांनाच मार्गदर्शक आणि अंतर्मुख करून गेली .सतीश बिडये आणि त्यांच्या नातीने तसेच बाबा परुळेकर यांनी टिप टिप बरसा पानी व काशीराम सावंत यांची कविता स्तर उंचावून गेली. सौ उषा परुळेकर यांनी योग विद्येचे जीवनातील महत्त्व विशद केले. दिगंबर राणे यांनी बालकविता सादर करून धमाल उडवून दिली.त्यानंतर सौ.रमा नाडकर्णी यांनी म्हटलेल “कौशल्येचा रामबाई ss या गीताने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. विजय कर्णिक यांनी करुळ चा रोंबाट प्रकारामध्ये प्रत्येकाच्या सवयींचा खुमासदार अनुभव देत एकपात्री अभिनय सादर केला .
दुसरे दिवशीच्या सत्रात सकाळी भरपेट नाष्ट्यानंतर,मित्र-मैत्रिणींनी फोंडाघाट मधील पंचायतन श्री गांगो – माऊली मंदिर, श्री विठ्ठल- रखुमाई मंदिर, घोणसरीचे गणपती मंदिर यांना भेट देऊन या वर्षात सर्व मित्र-मैत्रिणींच्या निरामय आरोग्यासाठी आणि स्वस्थतेसाठी प्रार्थना केली. त्यानंतर देवघर धरणावर सर्वांनीच पायी स्वारी करत, जलाशयाच्या सानिध्यात सेल्फी – फोटो घेण्याचा आनंद लुटला. याकरिता पाटबंधारे विभागाचे पॅरिस व कोलते यांनी विशेष सहकार्य केले.
दुपारच्या सत्रात पुन्हा पुन्हा पूर्णानंद भवनात “बचपन के दोस्त” ग्रुपचा मेळा जमला. वर्षभरात झालेल्या मित्र-मैत्रिणींच्या वाढदिवसाचे प्रातिनिधिक स्वरूपात केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी,” जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजारss अशा मनस्वी शुभेच्छा देण्यात आल्या. मित्र-मैत्रिणींच्या सौ . नी हळदीकुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला.यावेळी भवन मध्ये काम करणाऱ्या महिलांनाही या उपक्रमात सहभागी करून आनंद लुटला. त्यानंतर उषा परुळेकर यांचे गाणे आणि छोट्या मृणाली बिडये हिचा शरारा शरारा sss नाच सर्वांचेच आकर्षण ठरला. त्याला जोड मिळाली ती, भवनचे व्यवस्थापक गौरव मुंज आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विनम्र आदरातिथ्य ची, त्यांनी पुरवलेल्या सुविधा- रुचकर जेवण आणि सेवा, सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरले. यावेळी नागेश तिरोडकर,पूर्णानंद भवनचे गौरव मुंज आणि सहकारी तसेच ज्येष्ठ मित्र परिवाराचा आदर-सत्कार करण्यात आला. सुजित सामंत सह सगळ्यांचे आभार मानण्यात आले.
गेल्या दीड दिवसाचा कालावधी संपूच असे प्रत्येकाला वाटत असताना,निरोपाची वेळ आली. उपस्थित सुनील कोरेगावकर, जया जाधव, बाबा परुळेकर, सुरेश तळेकर, महादेव कुबल,विजय भालेकर, अशोक शितोळे, बबन पवार, सरिता जठार, मीना सामंत- तीरोडकर ,वनकुदरे, बाळा फोंडके ,सुरेश कुडतरकर, दिगंबर राणे, अभिमन्यू मेस्त्री, सुभाष मसुरकर, रवींद्र पवार,आबा सामंत, कुमार नाडकर्णी,विजय कर्णिक, शालिनी हळदीवे, काशीराम सावंत- पटेल इ.सपत्नीक यांनी एकमेकांना निरोप देताना सर्वच भावुक झाले.मात्र पुढील वर्षी पुन्हा भेटण्याचे इरादा आणि इर्षा सर्वांनीच व्यक्त केली.गौरव मुंज यांचे “ये दोस्ती हम नही तोडेंगे, तेरा साथ ना छोडेंगे sss हे गीत सर्वांनाच यावेळी अंतर्मुख करून गेले.