देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्राप्त.

देवगड,दि.१५ जानेवारी
देवगड येथील शेठ म.ग .हायस्कूलच्या चार विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी या संस्थेमार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे.
ग्लोबल फाउंडेशन या संस्थेमार्फत शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी ज्ञानज्योत शिष्यवृत्ती दिली जाते. यावर्षी हायस्कूल मधील कु. स्वरा दीपक कदम इयत्ता सातवी, ऋतिका शैलेंद्र कणेरकर इयत्ता सहावी, अनुष्का अश्विन चाळके व सानिका रोहिदास नार्वेकर इयत्ता नववी या विद्यार्थिनींना सदर शिष्यवृत्तीची प्रत्येकी रुपये ३६०० प्राप्त झालेली आहे.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद परब यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक महादेव घोलराखे यांनी तसेच संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाने ग्लोबल फाउंडेशन या संस्थेचे विशेष आभार मानले आहेत. सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी शाळेतील शिक्षक प्रवीण खडपकर व आफरीन पठाण यांनी विशेष मेहनत घेतली.