सुप्रसिद्ध फोटोग्राफर श्री. विकास इंगळे ;फोटोग्राफर असोसिएशन कणकवली याच्या वतीने फोटोग्राफी कार्यशाळा
कणकवली दि.१८ मार्च(भगवान लोके)
फोटोग्राफी व्यवसायासह अन्य कोणत्याही क्षेत्रात सातत्य ठेवले तर यश आपलेच असते. सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच फोटोग्राफीमध्येही अनेक स्पर्धा असल्या तरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून या क्षेत्रात आपण भरारी घेऊ शकता. यामुळे या क्षेत्रात सातत्य कायम राखल्याच कुठच्याही शिखरावर आपण पोहचू शकता. नवनवीन गोष्टी शिकून फोटोग्राफी व्यवसायात उज्वल यश संपादन करा असे मार्गदर्शन मुंबईतील सुप्रसिद्ध फोटोग्राफर श्री. विकास इंगळे यानी केले. ते कणकवली तालुक्यातील कासार्डे नागसावंतवाडी येथे फोटोग्राफर असोसिएशन कणकवली याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय फोटोग्राफी कार्यशाळेत ते बोलत होते
यावेळी कणकवली फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष विनायक पारधीये, उपाध्यक्ष योगेश चव्हाण, खजिनदार विनोद दळवी, सचिव सुरजित ढवण, संजय राणे, संतोष कांबळे, सागर कराळे, वसंत आडीवरेकर, सचिन मुणगेकर, सचिन गोसावी याच्यासह तीस ते पस्तीस फोटोग्राफर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.इंगळे म्हणाले, फोटोग्राफी व्यवसायात येणारे अडचणी, विविध बदल स्वीकारून सोशल मिडीयाच्या काळात कशी टिकवून ठेवावी याच्या माहितीसह सध्या नवनवीन तंत्रज्ञान,प्रकाश व्यवस्था येत असताना त्याचा फोटोग्राफी व्यवसायात कसा वापर करायचा याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर फोटोग्राफर म्हणून काम करत असताना आपले भविष्यातील जीवन कसे नियोजन करायचे याचे बहुमूल्य मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दोन दिवसीय कार्यशाळेत फोटोग्राफी संदर्भात जिल्ह्यातील फोटोग्राफर याना बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले असून कणकवली फोटोग्राफर असोसिएशनच्या सर्वच सभासदांनी यशस्वी नियोजन करत ही कार्यशाळा संपन्न केली.