सावंतवाडी, दि.१८ मार्च
आचारसंहितेचा प्रशासन बाहू करत आहे मात्र आज श्रमिक मुक्ती दल आणि सत्यशोधक जन आंदोलन प्रणित समितीने माणगाव खोऱ्यातील केरवडे पंचक्रोशी वन हक्क समिती संघर्ष समितीचा मोर्चा वन खात्याच्या जिल्हा कार्यालयावर काढला. मात्र या दरम्यान पोलीस उपस्थित नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.
श्रमिक मुक्ती दल आणि सत्यशोधक जनआंदोलन प्रणीत केरवडे पंचक्रोशी वन हक्क संघर्ष समितीच्या वतीने उपवनसंरक्षक कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी उपस्थिती दर्शवली नसल्याने श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी नाराजी व्यक्त केली ते म्हणाले, पोलीस विशेषतः उपस्थित असतात आणि ते आंदोलन स्थळी आंदोलक आणि संबंधित कार्यालयातील अधिकारी यांच्याशी समन्वय घडवून आणतात. पण आज पोलिसांनी उपस्थिती दर्शवली नाही .दरम्यान यानंतर पोलीस त्या ठिकाणी उपस्थित राहिले.
सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालयावर वन हक्क समितीने माणगाव खोऱ्यातील केरवडे पंचक्रोशी मधील आकारी पड जमीन शेतकऱ्यांच्या नावावर लागली पाहिजे यासाठी आंदोलन पुकारले होते, हे आंदोलन सावंतवाडी शहरातून उपवनसंरक्षक कार्यालयावर आले मात्र या दरम्यान पोलिसांना आगाऊ निवेदन देऊनही या ठिकाणी उपस्थित राहिले नसल्याने श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
संपत देसाई म्हणाले,मागे शिक्षण हक्क समितीने आजरा ते सावंतवाडी दरम्यान आंदोलन पुकारले होते. आजरा ते आंबोली पर्यंत आंदोलक पोहोचले तेव्हा पोलीस आंबोली येथे मोठा फौजफाटा ठेवून उपस्थित राहिले. तसेच वेळोवेळीच्या आंदोलनात पोलीस उपस्थित राहतात. तसेच संबंधित कार्यालय आणि आंदोलक यांचा समन्वय घडवून आणतात. मात्र आज या आंदोलनादरम्यान पोलीस उपस्थित राहिले नाहीत आणि समन्वय घडवून आणू शकले नाहीत याबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पाच ते सहा पोलीस या ठिकाणी उपस्थित राहिले. मात्र आंदोलक आणि वनखात्याशी समन्वय हा वनखात्या मध्ये ड्युटीला असणाऱ्या हवालदाराने घडवून आणला.


