शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजन मान्यवराच्या हस्ते उदघाटन सपन्न.
मुंबई, दि.१८ मार्च
राज्यामध्ये विविध भागात विविध संस्कृतीचे दर्शन घडते. समृद्ध अशा लोक परंपरेने नटलेले राज्य आहे. वस्त्र संस्कृती, खाद्य संस्कृती, वाद्य संस्कृती व लोकसंस्कृती विविध प्रदेशानुसार बदलत गेलेली दिसून येते. नमन, दशावतार, तमाशा शाहिरी, कलगीतुरा, जाखडी खेळे इत्यादी लोककला प्रकार अस्तित्वात आहेत. या लोककलेपैकी दशावतार नाट्य महोत्सव २०२४ चे उदघाटन विक्रोळी येथील स्वातंत्रवीर सावरकर नाट्यगृह कामगार कल्याण विभागाच्या सभागृहात मान्यवराच्या हस्ते दिनांक १७ मार्च २०२४ रोजी उदघाटन करण्यात आले. रामायण व महाभारतातील विविध घटना, प्रसंग इत्यादीवर आधारित नाट्य प्रसंगाचे सादरीकरण या महोत्सवादरम्यान रसिकाना अनुभवायला मिळाले
आज ओंकार नटेश्वर दशावतार नाट्य मंडळ, कालेली वं हेळेकर दशावतार नाट्य मंडळ, कारीवडे आपली पारंपरिक नाट्य कला सादर करणार आहेत. उद्या दिनांक १८ मार्च २०२४ रोजी गुरूकृपा दशावतार लोककला नाट्य मंडळ, हळवलवं सिंधुरत्न दशावतार नाट्य मंडळ तर दिनांक १९ मार्च २०२४ रोजी वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली व श्री देवी यक्षिणी दशावतार नाट्य मंडळ, माणगाव आणि दिनांक २० मार्च २०२४ रोजी बाबी नालंग दशावतार नाट्य मंडळ, ओसरगाव वं बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, कवठी हे नाट्य सादर करतील तर हा महोत्सव सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, आवेरा व श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ, इंन्सुली यांच्या रामायण महाभारतातील नाट्य प्रसंगाने समारोप होणार आहे.
विक्रोळी येथे आयोजित कारण्यात आलेल्या दशावतार नाट्य महोत्सवाचे रसिक प्रेक्षकानी लाभ घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव मा.विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक श्री.विभिषण चवरे यांनी केले आहे..