साकेडी येथे २१ जानेवारी रोजी वारकरी दिंडी भजन स्पर्धा

भजनप्रेमी ग्रामस्थ व वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळाचे आयोजन

कणकवली दि.१५ जानेवारी(भगवान लोके)

प्रति वर्षाप्रमाणे कणकवली तालुक्यात साकेडी येथे २१ जानेवारी रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता वारकरी दिंडी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निमंत्रित भजन संघाची एक दिवसीय वारकरी दिंडी भजन स्पर्धा साकेडी शाळा नंबर १ जवळील चव्हाटा या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथम पारितोषिक ७००१ व चषक, द्वितीय पारितोषिक ४,४४४ व चषक, उत्कृष्ट पखवाज वादक, उत्कृष्ट गायक यांच्यासाठी वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन साकेडीतील भजन प्रेमी ग्रामस्थ व वाळकेश्वर नवतरुण प्रसादिक भजन मंडळ यांच्या वतीने भूषण शिरसाट, गणेश वर्दम, सागर मेस्त्री, सागर राणे, भास्कर दळवी आदींनी केले आहे.