कणकवली दि.१८ मार्च(भगवान लोके)
शिवडाव-ओटोसवाडी येथील मांडकर देवालयाचा वार्षिक हरिनाम सप्ताह २० व २१ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच भजने, दिंडी व पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. बुधवार २० मार्च रोजी सकाळी १० वा. पारंपारिक घटस्थापनेने या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दैनंदिन पूजाअर्चा, हरिपाठ, काकड आरती, भजने त्याचबरोबर रात्री पालखी मिरवणूक व वाडीतील दिंड्यांचे कार्यक्रम तर गुरुवार २१ मार्च रोजी सकाळी आरती, भजने व अन्य धार्मिक कार्यक्रमांनी या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. हरिनाम सप्ताहाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवडाव-ओटोसवाडी भूतनाथ बाळगोपाळ मंडळाने केले आहे.